शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दक्षेश जिल्ह्यात चौथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 
दक्षेश जिल्ह्यात चौथा
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दक्षेश जिल्ह्यात चौथा

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दक्षेश जिल्ह्यात चौथा

sakal_logo
By

73244
दक्षेश मांजरेकर

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये
दक्षेश जिल्ह्यात चौथा

मुणगे, ता. ४ ः येथील श्री भगवती हायस्कूलचा विद्यार्थी दक्षेश मांजरेकर याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा क्रमांक प्राप्त केला.
दक्षेश हा भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित भगवती हायस्कूलमध्ये सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. या परीक्षेची काल (ता. ३) रात्री उशिरा शासनाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये दक्षेश याने ८८.५९ टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. गेल्या जुलैमध्ये ही परीक्षा झाली होती. यापूर्वी दक्षेश याने मंथन टॅलेंट, बीडीएस स्पर्धेत राज्यस्तरावर यश प्राप्त केले आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. या यशाबद्दल दक्षेश व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, व्यवस्थापक आबा पुजारे, शाळा समिती अध्यक्ष नीलेश परुळेकर, सरपंच साक्षी गुरव, पोलिस पाटील साक्षी सावंत, सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.