
प्रवाशांचा एसटीतील प्रवास सुरक्षित करा
rat०४३२.txt
(पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat४p२६.jpg-
७३२३७
रत्नागिरी ः एसटीच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देताना नीलेश राणे यांचे शिष्टमंडळ.
---
प्रवाशांचा एसटीतील प्रवास सुरक्षित करा
नीलेश राणे ; तीव्र आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी, ता. ४ ः एसटी महामंडळाच्या गाड्यांमध्ये आग विझवण्याचे फायर फायटर नाही, प्रथमोपचार पेटी नाही, गाड्या अस्वच्छ असतात. बाह्यभाग पत्रा निघालेला, उचकटलेला असा धोकादायक असतो. यामध्ये तत्काळ सुधारणा करून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्न करा, अशी चर्चा माजी खासदार आणि भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एसटी विभाग नियंत्रकांशी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुद्दे सोडवण्याचे आश्वासन दिले. आवश्यक उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाऱा दिला.
या संदर्भातील निवेदन राणे समर्थक सतेज नलावडे, नंदू चव्हाण, भाजप युवा मोर्चा, रत्नागिरीचे संकेत कदम, तालुका उपाध्यक्ष रत्नागिरी दीपक आपटे, शक्तीकेंद्रप्रमुख भाजपा कुवारबाव यांनी विभाग नियंत्रकांची भेट घेतली व प्रवाशांच्यादृष्टीने महत्वाच्या विषयांवर निवेदन दिले. यामध्ये रेल्वेस्टेशन येथे जाणाऱ्या एसटी गाड्या रेल्वे आल्यावर सोडाव्यात. कारण, ट्रेन येते त्या वेळी गाडी नसते तसेच कोणतीही सूचना न देता फेऱ्या रद्द केल्या जातात. महामंडळाच्या एसटी गाड्यांमध्ये आग विझवण्याचे फायर फायटर मशीन नाही, प्रथमोपचार पेटी नसणे, गाड्यांचे बाह्य भाग धोकादायक स्थितीत असतात, अस्वच्छता असते अशा अनेक विषयांवर चर्चा केली. प्रवाशांना एसटी महामंडळाकडून दर्जेदार सेवा मिळावी यासाठी नीलेश राणे यांनी एसटी विभाग नियंत्रकांशी फोनवरून चर्चा केली. अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे मुद्दे सोडवण्याचे मान्य केले. भेटलेल्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, यामध्ये निवेदनाप्रमाणे सुधारणा न झाल्यास पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.