मिस अँड मिसेस कोकण सौंदर्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिस अँड मिसेस कोकण सौंदर्य स्पर्धा
मिस अँड मिसेस कोकण सौंदर्य स्पर्धा

मिस अँड मिसेस कोकण सौंदर्य स्पर्धा

sakal_logo
By

मिस अँड मिसेस कोकण सौंदर्य स्पर्धा
खेड : कोकणातील सौन्दर्यवती साठी निखिल फिल्म व माझे कोकण यांच्यावतीने मिस अँड मिसेस कोकण २२-२३ या कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा जानेवारीमध्ये पार पडणार आहे. यामध्ये सौंदर्यवतींना पोर्टफोलिओ शूट, नृत्य प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, व्हिडिओ शूट रॅम्पवॉक, आहार आणि पोषण प्रशिक्षण आदींचा समावेश असून ४० जणींना यामध्ये स्थान देण्यात येणार आहे. भरणेत या वेळी सौंदर्य मुकुटाचे अनावरण करण्यात आले. विजेत्यांना मिस कोकण २२-२३ तर मिसेस कोकण २२-२३ हा सन्मान मिळणार आहे. या व्यतिरिक्त रोख रक्कम व भेटवस्तू, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबरोबर मॉडेलिंग असाईनमेंट मीडिया कव्हरेज हेदेखील देण्यात येणार आहे.
----
ग्रामसेवकांकडे जादा पदभाराने गैरसोय
खेडः तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांना अन्य ग्रामपंचायतींचा जादा पदभार सोपवण्यात आला असून यातील काहींना ५० ते ६० किमी
अंतरावरील ग्रामपंचायती मिळाल्याने कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना विभागातील जवळच्या ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नाना चाळके यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे. तालुक्यातील किंजळेतर्फे नातू या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे ६० किमी अंतरावर असलेल्या नातूनगर ग्रामपंचायतीचा जादा पदभार सोपवण्यात आला आहे. कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांची गैरसोय होत असून ग्रामसेवकांचा प्रवासदेखील त्रासदायक ठरत आहे. ग्रामसेवकांना विभागातील जवळच्या ग्रामपंचायतींचा जादा पदभार सोपवल्यास ग्रामस्थांना व ग्रामसेवकांना सोयीचे ठरणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
---