अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला 5 हजाराचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला 5 हजाराचा दंड
अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला 5 हजाराचा दंड

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला 5 हजाराचा दंड

sakal_logo
By

rat०४३८. txt

(पान ३ साठी)

अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला दंड

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः शहरातील फगरवठार ते जेलरोड रस्त्यावर एका दगडाच्या बांधाच्या आडोशाला अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याला न्यायालयाने ५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. नुमान मुनीर दर्वे (वय २५, एकतामार्ग, मारूती मंदिर, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १७ ऑक्टोबरला २०२२ या कालावधीत वरचा फगरवठार ते जेलरोड या रस्त्यावर बीएसएनएल ऑफिससमोरील बोळात एका जांभ्या दगडाच्या आडोशाला निदर्शनास आला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या सूचनेनुसार, पोलिस गस्त घालत होते. त्यांना संशयित बोळात एका दगडाच्या आडोशाला सिगारेट पेटवून काहीतरी ओढत असल्याचे दिसले. चौकशीत गांजासदृश अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली. पोलिसांना पंचनाम्यात त्याच्याकडे लायटर, प्लास्टिकच्या छोट्या पारदर्शक पिशवीत ३ ग्रॅमची उग्र वासाची पाने आढळून आली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल मंदार मोहिते यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज (ता. ४) या खटल्याचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने त्याला ५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.
---