बाल संसद, महोत्सवांसाठी पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल संसद, महोत्सवांसाठी पुढाकार
बाल संसद, महोत्सवांसाठी पुढाकार

बाल संसद, महोत्सवांसाठी पुढाकार

sakal_logo
By

73289
मळेवाड ः बालसाहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करताना दिव्यांग कुमारी. सोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, वासुदेव नाईक, उषा परब, अॅड. संतोष सावंत व अन्य.

बाल संसद, महोत्सवांसाठी पुढाकार

महेश धोत्रे ः मळेवाड येथे बाल साहित्य संमेलन उत्साहात

सावंतवाडी, ता. ४ ः शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते, तसेच पुढच्या वर्षीपासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून बाल साहित्य संमेलन, महोत्सव, बाल संसदेच्या आयोजनासाठी प्राथमिक शिक्षण विभाग निश्चितच पुढाकार घेईल, अशी ग्वाही प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आणि मळेवाड ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून मळेवाड कुलदेवता विद्यामंदिर शाळा क्रमांक २ येथे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी धोत्रे बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ मुलांच्या ग्रंथ दिंडीने करण्यात आला. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कवयित्री उषा परब, कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, प्रा. सुभाष गोवेकर, सरपंच मीनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे, कविता शेगडे, अर्जुन मुळीक, महेश शिरसाट, अमोल नाईक, गिरिजा मुळीक, मधुकर जाधव, शेजल नाईक, समृद्धी कुंभार, उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, महादेव देसाई, दीक्षा आडारकर, लवू सातार्डेकर, संध्या बिबवणेकर, संगीता राळकर, जयश्री हरमलकर, नम्रता देऊळकर, शीतल वेंगुर्लेकर, संजय बांबुळकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी भरत गावडे, डॉ. दीपक तुपकर, दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, प्रतिभा चव्हाण, ऋतुजा सावंत-भोसले, प्रज्ञा मातोंडकर, रामदास पारकर, प्रा. रुपेश पाटील, मीनल नाईक जोशी आदी उपस्थित होते.
बाल साहित्य सभेचे अध्यक्ष वैष्णवी टिकस यांच्या उपस्थितीत बालसाहित्य सभेच्या उद्घाटक दिव्यांग कुमारी सुचिता कारुडेकर, वैष्णवी कारुडेकर, निकिता टिकस, राज्य व राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी नाईक यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी सुचिता कारुडेकर यांनी, मोबाईलच्या जमान्यामध्ये साहित्य निर्माण करणारे बाल साहित्य संमेलन होत असल्याचा आनंद आहे. या संमेलनातून निश्चितच साहित्य निर्मितीचा संदेश मिळेल. बालसाहित्य निर्माण व्हावे, म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचा उद्देश स्तुत्य आहे, असे सांगितले. बाल साहित्य संमेलन होत असल्याचा आनंद आहे. कोकण मराठी साहित्य परिषद बाल साहित्यिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशा मिळेल, असे गटविकास अधिकारी नाईक म्हणाले. शिक्षण विभागाने शाळास्तरावर दरवर्षी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी व मुलांमध्ये साहित्य व मराठी भाषा वाढीसाठी बाल साहित्य संमेलने घ्यावीत, अशी मागणी केली. यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी निश्चितच पुढील वर्षीपासून बाल साहित्य महोत्सव संमेलनासारखे उपक्रम घेतले जातील, असे स्पष्ट केले.