लुई ब्रेल जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुई ब्रेल जयंती उत्साहात
लुई ब्रेल जयंती उत्साहात

लुई ब्रेल जयंती उत्साहात

sakal_logo
By

rat०५१३.txt

( टुडे पान ३)

फोटो rat५p६.jpg ः
७३३८६

खेड ः स्नेहज्योती अंध विद्यालयात लुई ब्रेल जयंतीच्या निमित्ताने मान्यवरांचा सन्मान करताना मुख्याध्यापक सेनगुप्ता मॅडम, उत्तमकुमार जैन.


प्रत्येक मुलांमध्ये विलक्षण क्षमता

मंगेश बुटाला ; स्नेहज्योती अंध विद्यालयात लुई ब्रेल जयंती

खेड, ता. ५ ः प्रत्येक मुलामध्ये एक विलक्षण वेगळी क्षमता असते ती सिद्ध करण्यासाठी त्यांना या मुख्य प्रवाहात आणून सोडण्याची स्नेहज्योती अंध विद्यालयाची कामगिरी उत्तम असून एक स्वयंपूर्ण आयुष्य इतर आयुष्यांना वेगळी ऊर्जा देत असते. तीच ऊर्जा ''ज्योतसे ज्योत जलाते चले'' या उक्तीनुसार इतर मुलांना प्रकाशवाटा ठरते. त्यामुळे स्नेहज्योती सारख्या सर्वच संस्थाचे कार्य हे समाजासाठी अनुकरणीय ठरते,असे प्रतिपादन उद्योजक मंगेश बुटाला यानी केले.
लुई ब्रेल यांच्या २१४व्या जयंतीनिमित्त स्नेहज्योती अंध विद्यालयात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. त्याप्रसंगी उद्योजक व सहजीवन शिक्षणसंस्थेचे सचिव मंगेश बुटाला बोलत होते. येथील विधीतज्ञ आनंद भोसले यावेळी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बुटाला यांनी लुई ब्रेल यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. विधीज्ञ आनंद भोसले यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज असावे. येणारी संधी पुन्हा मिळेलच याची खात्री नसते. आपल्यातील जिद्द अशीच कायम ठेवा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला. गेल्या १५ दिवसांपासून वेगवेगळ्या शालेयअंतर्गत स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ या वेळी पार पडला. पाहुण्यांनी मुलांचे अभिनंदन करून येणार्‍या फेडरेशनच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करून खूप बक्षिसे जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्तमकुमार जैन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून संस्थेची आणि शाळेची वाटचाल कथन केली. मुख्याध्यापक सेनगुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले.