
पुळासमधील विकास कामांचा आमदार नाईकांकडून आढावा
७३४००
आमदार नाईकांनी घेतला
विकास कामांचा आढावा
पुळासला भेट; ग्रामस्थांचा सेनेच्या पाठीशी राहण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ःआमदार वैभव नाईक यांनी पुळास गावाला भेट देत तेथील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आमदार नाईक यांनी काल (ता.५) पुळास गावात भेट दिली. यावेळी वरचीवाडी येथे शिवसैनिकांच्यावतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामस्थ व शिवसैनिकांशी आमदार नाईक यांनी चर्चा केली. विकास कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास होत असून शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, दीपक आंगणे, स्वप्नील शिंदे, शिरी नेवगी, श्री. कोराने, सरपंच विनया निकम, उपसरपंच आत्माराम सावंत, मोहन तावडे, सखाराम म्हापसेकर, स्मिता निकम, मनस्वी तावडे, प्रणिता सावंत, विश्राम निकम, सचिन परब, निलेश गाड, गोविंद गाड, धाकू लांबर, मोहन नाईक, महादेव तावडे, रुपेश निकम, आत्माराम घाडी, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.