कणकवली : आज पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : आज पुरस्कार वितरण
कणकवली : आज पुरस्कार वितरण

कणकवली : आज पुरस्कार वितरण

sakal_logo
By

काणेकर ट्रस्ट पुरस्कारांचे
आज कणकवलीत वितरण
निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेत्‍यांचाही होणार सत्‍कार
कणकवली, ता. ५ : येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कारांचे वितरण उद्या (ता. ६) होणार आहे. विद्यामंदिर हायस्कूल लगतच्या महाराज मंगल कार्यालयात दुपारी साडेतीनला हा कार्यक्रम होणार आहे. यात चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही बक्षीस वितरण होणार आहे.
काणेकर ट्रस्टच्या कार्यक्रमात पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव शिरसाट असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्‍घाटन भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांच्या हस्ते होणार होईल. या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार, संपादक प्रकाशक प्रकाश केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर यांनी केले आहे.