रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा

sakal_logo
By

rat०५३७.txt

बातमी क्र. ३७ पान २ साठी

rat५p२७.jpg-
७३४७४
रत्नागिरी : जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या जिल्हा दौऱ्यात सहभागी फोटोग्राफर्स.

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा जिल्हा दौरा

रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनने फोटोग्राफरच्या भेटीगाठी घेऊन फोटोग्राफर बंधूच्या समस्या जाणून घेतल्या. त्याकरिता जिल्हा दौऱ्याचे आयोजन केले होते.
यामध्ये रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, कार्याध्यक्ष गुरू चौगुले, सचिव प्रविण पाटोळे, सहसचिव विनय गोंधळेकर, खजिनदार सुरेंद्र गिते, संघटक संदेश टिळेकर व पदाधिकारी सहभागी झाले. सर्व ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. राजापूर, लांजा, संगमेश्वर-देवरूख, रत्नागिरी, गुहागर, दापोली, खेड, चिपळूण या सर्व तालुका असोसिएशनसोबत भेटी घेतल्या. फोटोग्राफर बंधूना येणाऱ्या समस्या, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन, संघटना नोंदणी व सदस्य वाढीसाठी उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्या. हा दौरा यशस्वी करण्यासाठी राजापूर तालुका अध्यक्ष राजेश खांबल, लांजा रविंद्र कोटकर, देवरूख संगमेश्वर राऊत, रत्नागिरी तालुका अध्यक्ष सचिन सावंत, गुहागर तालुका अध्यक्ष बावधनकर, दापोली तालुका अध्यक्ष महेश्वर जाधव, मंडणगडमधून पिंपळकर, खेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब सासणे, चिपळूण तालुका अध्यक्ष सचिन शेठ व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.