पांगारीतर्फे वेळंब येथे बांधले 25 मीटरचे 2 विजय बंधारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांगारीतर्फे वेळंब येथे बांधले 25 मीटरचे 2 विजय बंधारे
पांगारीतर्फे वेळंब येथे बांधले 25 मीटरचे 2 विजय बंधारे

पांगारीतर्फे वेळंब येथे बांधले 25 मीटरचे 2 विजय बंधारे

sakal_logo
By

rat०५३२.txt

( पान ५ )

rat५p२४.jpg,
७३४६२
विजय बंधारा बांधण्यासाठी जमलेले ग्रामस्थ.

rat५p२५.jpg ः
७३४६३
पांगारीतर्फे वेळंब येथे बांधले २५ मीटरचे २ विजय बंधारे


वेळंब ग्रामपंचायतीच्या श्रमदानातून दोन बंधारे

गुहागर, ता. ५ ः पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत ग्रामपंचायत पांगारीतर्फे वेळंबच्यावतीने ''मिशन बंधारे'' उपक्रमांतर्गत ३ जानेवारीला गावातील नदीवर २५ मीटर लांबीचे २ विजय बंधारे बांधण्यात आले.
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत गेली अनेक वर्ष पांगारी वेळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्थांकडून श्रमदानातून बंधारे बांधण्यात येतात. हे २५ मीटर लांबीचे २ बंधारे बांधल्यामुळे लाखो लिटर वाहून जाणारे पाणी अडले आहे. या बंधाऱ्याचा उपयोग गावातील नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी होतो. नदीशेजारी असलेल्या नारळ-सुपारीच्या बागांनाही या पाण्याचा उपयोग होतो.
या वेळी सरपंच विष्णू वीर यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या. या वेळी सरपंच विष्णू वीर, ग्रामपंचायत सदस्य विद्या खांबे, सुजाता खांबे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप खांबे, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, मंडळ कृषी अधिकारी पिसाळ, कृषी पर्यवेक्षक प्रदीप गवारी, कृषी सहाय्यक अमित शेळके, ग्रामसेवक विनोद तोडणकर यांच्यासह शिवाजी खांबे, अनंत खांबे, शिवराम तांबे, अनुराधा खांबे, ग्रामपंचायत कर्मचारी, खांबेवाडी, तांबेवाडी, फौजदारवाडी, गिजेवाडीतील अनेक ग्रामस्थ, महिला बचतगटांच्या महिलांनी श्रमदान केले.