राजापूर ः गाळ उपशासाठी महसूल, नगर पालिकेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः गाळ उपशासाठी महसूल, नगर पालिकेचा पुढाकार
राजापूर ः गाळ उपशासाठी महसूल, नगर पालिकेचा पुढाकार

राजापूर ः गाळ उपशासाठी महसूल, नगर पालिकेचा पुढाकार

sakal_logo
By

rat5p17.jpg ःKOP23L73396 राजापूर ः मदतीचा धनादेश प्रातधिकारी वैशाली माने यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार राजन साळवी.

गाळ उपशासाठी महसूल, नगर पालिकेचा पुढाकार

राजापुरात निधी उभारण्याला मिळतेय लोकसहभागाचे बळ

राजापूर, ता. ५ ः दरवर्षी अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येऊन शहराला भेडसावणार्‍या पूर समस्येवर मात करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि महसूल व नगर पालिका यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून गाळ उपसा करण्याचा निर्धार राजापूरवासीयांनी केला आहे. या उपक्रमाकरिता आमदार डॉ. राजन साळवी यांनी आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. वेतनाच्या रक्कमेचा धनादेश त्यांनी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे गाळ उपशासाठी निधी उभारण्याला हळूहळू बळ मिळू लागले आहे.

महसूल विभाग, राजापूर नगर पालिका यांच्या जोडीने नाम फाउंडेशनने राजापूर शहरातून वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांमधील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये नाम फाउंडेशनकडून नदीपात्रातील गाळ उपसण्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्री तसेच यांत्रिक कर्मचारी पुरवले आहेत. या मशिनरीसाठी लागणारे डिझेल व अन्य खर्च लोकसहभागातून उभा केला जाणार आहे. या बैठकीमध्ये गाळ उपशाच्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार राजापूरवासीयांनी केला असून त्याप्रमाणे अनेकांनी या उपक्रमासाठी सढळहस्ते आर्थिक मदत केली आहे.
साळवी यांच्यासह विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांच्यासह वैयक्तिक स्वरूपामध्येही अनेकांनी गाळ उपशासाठी मदत केली आहे. या वेळी तहसीलदार शीतल जाधव, नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, शिवसेना शहरप्रमुख संजय पवार, विभागप्रमुख संतोष हातणकर उपस्थित होते. अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी आवश्यक असलेली लोकवर्गणी उभारण्याच्या कामाला एकप्रकारे बळ मिळाले आहे.