Mon, Jan 30, 2023

चिपळूण ः विहिरीत पडलेल्या सांबरला मिळाले जीवनदान
चिपळूण ः विहिरीत पडलेल्या सांबरला मिळाले जीवनदान
Published on : 5 January 2023, 1:53 am
पान ३
विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डेमधील मौजे कुटरे बादेकोंड येथे दीपक शिर्के यांच्या घराच्याशेजारील पडक्या विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला वनविभागाच्या अधिकऱ्यांनी सुखरूपरित्या बाहेर काढून जीवदान दिले. सावर्डेतील मौजे कुटरे बादेकोंड येथील रहिवासी दीपक शिर्के यांच्या घराच्या शेजारील पडक्या विहिरीमध्ये सांबर पडल्याची माहिती त्यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागाला दिली. वनविभागाच्या कर्मऱ्यांनी तत्काळ तेथे जाऊन त्या सांबरास बाहेर काढले. बचावकार्यात उमेश आखाडे, वनपाल सावर्डे, गुंठे, वनरक्षक नांदगाव यांनी सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, वनपाल उमेश आखाडे आदींनी सहभाग घेतला.