क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat०५२८.txt

( पान ३)

टेम्पोची तोडफोड प्रकरणी दोघांवर गुन्हा


दाभोळ ः टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पोची काच फोडणाऱ्या २ संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवीण सुरेश चव्हाण हे बुधवारी (ता. ४) रात्री काळकाई कोंड दापोली येथून टेम्पो मध्ये माल भरून पुणे येथे जात होते. दापोली-मंडणगड मार्गावरील खेर्डी गावातील पांढरीची वाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या कारचा आरसा टेम्पोच्या मागच्या गार्डला लागला. चव्हाण यांनी टेम्पो थांबवला व कारजवळ त्यांची गाडी नेली. या कारमधून दोन व्यक्ती बाहेर आल्या व त्यातील एकाने हातात असलेल्या टॉमीने टेम्पोची पुढील काच फोडली व चव्हाण यांना टेम्पोबाहेर काढून मारहाण केली. त्यानंतर तेथे एक रिक्षावाला आला व त्याने मारहाण करून पळून जाणाऱ्या मोटारीचा क्रमांक सांगितला. त्यानंतर चव्हाण यांचा भाऊ तेथे आला व त्याने चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बिलाल हमीद रखांगे व नदीम हमीद रखांगे अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केली आहेत.अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बुरटे करत आहेत.
---
दाभीळ-पांगारी खाडीमध्ये पंपाने वाळूचे उत्खनन

दाभोळ ः दापोली तालुक्यातील दाभीळ-पांगारी खाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन सक्शन पंपाच्या साहाय्याने केले जात असून, त्याकडे दापोलीचा स्थानिक महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे.

या खाडीच्या किनाऱ्यावर तीन प्लॉट तयार करण्यात आले असून, रात्री या खाडीतून वाळूचे उत्खनन करून बोटीत भरून या प्लॉटवर उतरवून डंपरच्या साहाय्याने राजरोस त्याची वाहतूक केली जाते. या खाडीमध्ये वाळूचे बेसुमार उत्खनन केले जात असल्याने खाडीकिनारी असलेल्या गावांना धोका उत्पन्न झाला आहे. काहीजणांनी रॉयल्टी भरून हातपाटीद्वारे वाळू काढण्याची परवानगी घेतली आहे; मात्र हातपाटीद्वारे वाळू न काढता सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन करून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. दररोज रात्री सुमारास एकामागून एक भरधाव धावणारे डंपर यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरातील नागरिकांना निद्रानाशाचे विकार होऊ लागले आहेत. महसूल यंत्रणेला या सर्व गोष्टी माहीत असूनही त्यांच्याकडून कारवाई केली जात अशीही चर्चा भागात सुरू आहे.

-