शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी
शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी

शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी

sakal_logo
By

73543
सिंधुदुर्ग- शिवराजेश्वर मंदिर

शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी
---
नूतनीकरण होणार; सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ठेवा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ ः ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरण कामासाठी एक कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले, ‘‘बंद असलेल्या कामाबाबत आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मंदिर नूतनीकरणाचे काम केव्हा सुरू करणार आहे, याबाबत विचारणा केली होती. त्यावर हे काम येत्या १५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या आधी अनेकांनी शिवराजेश्वर मंदिराची दुरुस्ती करणार, अशा घोषणा केल्या होत्या. काहींनी स्वखर्चातून मंदिर दुरुस्तीची ग्वाही दिली. मात्र, आमदार नाईक यांनी यशस्वी पाठपुरावा करीत दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून आणला.’’
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक व प्राचीन शिवराजेश्वर मंदिर देशातील एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो जण येतात. मंदिराची डागडुजी, बांधकाम व नूतनीकरण करणे गरजेचे असल्याची मागणी आमदार नाईक यांनी शासनाकडे सातत्याने केली होती. राज्य सरकारची मंजुरी, केंद्रीय पुरातत्त्व खात्याची परवानगी अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत मंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी आमदार नाईक यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर करून आणला. त्या अंतर्गत मंदिराच्या खांबांची व इतर ६० लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी ३० लाखांचे बिल अदा करण्यात आले आहे. कुशल कारागिरांकडून हे काम करून घेतले जाते. ते कारागीर सध्या परगावी असल्याने काम बंद आहे. येत्या १५ जानेवारीपासून पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार नाईक यांना सांगितले असल्याची माहिती श्री. खोबरेकर यांनी दिली.
--------------------