देवगडात गावठी भाज्यांना मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात गावठी भाज्यांना मागणी
देवगडात गावठी भाज्यांना मागणी

देवगडात गावठी भाज्यांना मागणी

sakal_logo
By

देवगडात गावठी भाज्यांना मागणी
देवगडः येथील बाजारात गावठी भाज्यांची आवक वाढली आहे. सकाळच्यावेळी ग्रामीण भागातील महिला पालेभाजी, शेवगा शेंगा तसेच अन्य भाज्या विक्रीस आणतात. त्यांना चांगली मागणी असल्याचे दिसते. ग्रामीण भागात हिवाळ्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. सकाळच्यावेळी देवगड आणि जामसंडे बाजारात भाजी विक्रीला येते. तसेच घरोघरी फिरूनही भाजी विक्री केली जाते. यामधून मोठी आर्थिक उलाढाल होते. ताज्या भाजीला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
....
देवगडात थंडीची चाहूल
देवगडः तालुक्याच्या किनारपट्टी भागात पुन्हा थंडीची चाहूल सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून थंडी आणि पहाटेच्यावेळी धुके पडत आहे. रात्रीच्यावेळी दवाचे प्रमाण वाढत आहे. थंडीचे प्रमाण वाढत असल्याने आंबा कलमे मोहोरण्याच्या दृष्टीने समाधानकारक चित्र असल्याचे मानले जात आहे. गेल्या दोन दिवसापासून किनारी भागातील वातावरणात फरक पडला आहे. वातावरणातील गारवा वाढला आहे. पहाटे धुके पसरलेले असते.
....