आचरा देवराई परिसरात साकारली मारुतीरायाची मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा देवराई परिसरात
साकारली मारुतीरायाची मूर्ती
आचरा देवराई परिसरात साकारली मारुतीरायाची मूर्ती

आचरा देवराई परिसरात साकारली मारुतीरायाची मूर्ती

sakal_logo
By

73611
आचरा ः देवराई परिसरात श्री मारुतीची सतरा फूट उंचीची मूर्ती साकारली आहे.

आचरा देवराई परिसरात
सतरा फुटी मारुतीरायाची मूर्ती
आचरा ः नीलेश सरजोशी यांच्या संकल्पनेतून आचरा देवराई परिसरात श्री मारुतीरायाची सतरा फूट उंचीची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली. ऋग्वेद सरजोशी यांच्या हस्ते काल विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला गावचे प्रमुख मानकरी विनीत मिराशी, रामेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन अवधूत हळदणकर, कपिल गुरव, मुकुंद घाडी, दशरथ घाडी, रमेश पुजारे, अरविंद सावंत, पवन पराडकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथील मूर्तिकार विलास मांजरेकर व ओमकार मांजरेकर या पिता-पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे मांजरेकरांनी यावेळी सांगितले. आचरा-मालवण टेंबली येथून काही अंतरावरच असलेल्या या परिसरात गावचे ग्रामोपाध्याय सरजोशी यांच्या संकल्पनेतून देवराई परिसर बनविण्यात येत आहे. या भागात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे.