देवगडमध्ये शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरेंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये शिवसेनेतर्फे 
मीनाताई ठाकरेंना अभिवादन
देवगडमध्ये शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरेंना अभिवादन

देवगडमध्ये शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरेंना अभिवादन

sakal_logo
By

73614
देवगड ः येथील पक्ष कार्यालयात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रतिमेला अभिवादन केले.

देवगडमध्ये शिवसेनेतर्फे
मीनाताई ठाकरेंना अभिवादन
देवगड ः येथील तालुका शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हा दिवस ‘ममता दिन’ म्हणून साजरा झाला. या वेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, नगरसेवक संतोष तारी, नगरसेवक विशाल मांजरेकर, नितीन बांदेकर, माजी नगरसेविका हर्षा ठाकूर, गणेश गावकर आदी उपस्थित होते.
........
73615
निरवडे ः शंभू पांढरे यांचे अभिनंदन करताना प्रमोद गावडे, दशरथ मल्हार आदी.

निरवडेत शंभू पांढरेचा गौरव
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळा निरवडे कोनापाल नंबर २ चा विद्यार्थी शंभू पांढरे हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा व सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाही उत्तीर्ण होऊन नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, सौ. प्रगती शेटकर, सौ. रेश्मा पांढरे, आदेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बाईत, सामाजिक कार्यकर्ते रमेश पांढरे, शिक्षणप्रेमी बाळा बाईत, मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर, सौ. नीलम कानसे, नारायण नाईक, उदेश नाईक, सौ. स्वप्नाली गरड आदी उपस्थित होते.