खुडीतील विद्यार्थ्यांनी अनुभवले अंतराळ विश्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुडीतील विद्यार्थ्यांनी 
अनुभवले अंतराळ विश्व
खुडीतील विद्यार्थ्यांनी अनुभवले अंतराळ विश्व

खुडीतील विद्यार्थ्यांनी अनुभवले अंतराळ विश्व

sakal_logo
By

73605
खुडी ः येथील अवकाश दर्शन कार्यक्रमात दुर्बिणीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी अवकाशाची पाहणी केली.

खुडीतील विद्यार्थ्यांनी
अनुभवले अंतराळ विश्व
मुणगे, ता. ६ ः अवकाश दर्शनातून अंतराळातील विश्वाचे दर्शन झाल्याची अनुभूती मिळाल्याचा आनंद आणि एक सुखद अनुभव मिळाल्याने खुडीतील विद्यार्थी आंनदीत झाले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नं.१ आणि खुडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अवकाश दर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाद्वारे एक सुखद अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
खुडी (ता.देवगड) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खुडी नंबर-१ आणि खुडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अवकाश दर्शन कार्यक्रम नुकताच झाला. यामध्ये विद्यार्थ्यांना सुर्यमाला, ग्रह, तारे, सप्तर्षी तारकासमूह, आकाशगंगा इत्यादींची सविस्तर माहिती रा. स्व. संघ संचलित देवगड तालुका फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प समितीच्या माध्यमातून मंदार माईणकर यांनी प्रोजेक्टरद्वारे छोट्या पडद्यावर करून दिली. त्यानंतर शाळेच्या समोरील मोठ्या पटांगणावर रात्रीच्या वेळेस ७ ते ९.३० पर्यंत दुर्बिणीतून सर्व मुलांना आकाशातील काही ग्रह-तारे यांचे दर्शन दाखविले. शनीभोवती असलेली कडी, गुरू, शुक्र, मंगळ पाहताना विद्यार्थी खूप उत्साहीत होते. त्याशिवाय ध्रुवतारा, कृतिका तारकासमूह, तारे उगम-शेवट, अवकाश संशोधन इत्यादी माहिती सविस्तर तपशीलवार सांगितली. त्याचबरोबर रा. स्व. संघ जनकल्याण समिती जिल्हा कार्यवाह जयेश खाडीलकर, प्रकल्प शिक्षक भगिरथ राणे, प्रकल्प प्रमुख चेतन पुजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. गोरे, खुडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम, श्री. पास्ते, श्री. तांबे, योगेश पाटील, श्री. साटम, सौ. सामंत, श्री. वाळके, श्री. राऊळ यांच्या प्रयत्नाने हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला गेला. योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.