स्पर्धा परीक्षांचा 80 टक्के पेपर बातम्यांवर आधारित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षांचा 80 टक्के पेपर बातम्यांवर आधारित
स्पर्धा परीक्षांचा 80 टक्के पेपर बातम्यांवर आधारित

स्पर्धा परीक्षांचा 80 टक्के पेपर बातम्यांवर आधारित

sakal_logo
By

rat६२३.txt

( टुडे पान ३ )

वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन आवश्यक

शशिकांत जाधव ; स्पर्धा परीक्षांचे ८० टक्के प्रश्न बातम्यांधारित

रत्नागिरी, दि.०६ ः स्पर्धा परीक्षा या ८० टक्के वर्तमानपत्रातील बातम्यांवरच आधारित असतात. म्हणून आपण दररोज वर्तमानपत्र वाचले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बातम्या आपण वाचताना आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. आपण आतापासूनच वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाल तेव्हा तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल असा सल्ला रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिला.
द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने पत्रकार दिनी आयोजित ''बातम्या का वाचाव्यात? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने'' या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी जमीर खलपे यांना पत्रकार भूषण आणि सिध्देश मराठे यांना पत्रकार सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या सभागृहात पत्रकार दिनी हा कार्यक्रम झाला. जाधव म्हणाले वर्तमानपत्र वाचणे ही काळाची गरज आहे. व्याख्यानमालेचा विषयही चांगला ठेवला आहे. तुम्हाला जर शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली तर पुढे महाविद्यालयीन जीवनात तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळू शकता. आज दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कोकण अव्वल असतो. स्पर्धा परीक्षेत मात्र कोकणचे अस्तित्व अल्प आहे. याचे कारण स्पर्धा परीक्षांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती नाही. ही जागृती निर्माण करण्याची गरज आहे. हे काम अशा व्याख्यानमालांमधून होऊ शकते. तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचलात तर तुम्हाला आजूबाजूला काय घडते? राज्यात, देशात आणि विदेशात काय घडते? याची माहिती मिळेल. वर्तमानपत्रातील क्रीडापानाबरोबरच पहिले पानही वाचणे महत्वाचे असते. कारण त्या पानावर महत्वाच्या बातम्या असतात. बातम्या वाचून आपल्या सामान्य ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते. संपर्क युनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून जमीर खलपे यांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर ते रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्यदूत म्हणून काम करतात.