चारूदत्तबुवा आफळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारूदत्तबुवा आफळे
चारूदत्तबुवा आफळे

चारूदत्तबुवा आफळे

sakal_logo
By

rat०६३४.txt

बातमी क्र.. ३४ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat६p२४.jpg-
७३७०३
रत्नागिरी ः कीर्तनसंध्येत कीर्तन सादर करताना चारूदत्त आफळेबुवा.
--
योग्य बोलणे म्हणजे संस्कारक्षम असणे

चारूदत्तबुवा आफळे ; गुरुंचे महत्व विशद करणारे निरुपण
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ६ ः अलीकडच्या ४० वर्षामध्ये शिक्षकांच्या वृत्तीमध्ये बदल झाला आहे. ४० वर्षापूर्वीपर्यंत कोणताच शिक्षक अशुद्ध बोलत नव्हता. कोणत्याही जाती-प्रजातीमधील व्याख्याताही चुकीचे बोलत नव्हता. योग्य बोलणे म्हणजे संस्कारक्षम असणे होय; पण आता प्रकटपणे चुका केल्या जातात आणि त्याचे समर्थनही केले जाते. अपूर्णतेचा अभिमान असलेले शिक्षक घडवले गेले आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीवर योग्य संस्कार होत नाहीत, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारूदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केली. येथे कीर्तनसंध्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कीर्तनात ते बोलत होते.

बुवांनी काय वानू आता संतांचे उपकार हा अभंग घेऊन त्यावर गुरूंचे महत्व विशद करणारे निरूपण केले. गुरूंची भूमिका कशी, किती आणि केवढी असावी या विषयी त्यांनी विविध उदाहरणे दिली. उत्तम गुरूंची रामायणकाळापासूनची काही उदाहरणे दिली. गुरू सातत्याने शिष्याला जागवत असतो. पूर्वीचे गुरू एकमेकांशी किती एकरूप होते. वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोन ऋषींचे उदाहरण दिले.
उत्तररंगात आफळेबुवांनी चित्तोड, मारवाड, राजस्थान, गुजरात आणि दिल्लीत झालेल्या साम्राज्यक्रांतीचा आढावा घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या सहा सोनेरी पाने या ग्रंथात कमलदेवी, देवलदेवी आणि खुश्रू खान यांनी केलेल्या पराक्रमासाठी एक प्रकरण लिहिले आहे. सन १००० नंतर १३०० पर्यंत दिल्लीत हिंदूंची सत्ता नव्हती; पण १३२० मध्ये एक वर्षासाठी का होईना; पण हिंदू राज्य निर्माण करण्यात यश आले. त्यानंतर चित्तोडचा हमीर राणा, लक्ष्मण सिंह, खिलजीनंतर दिल्लीत आलेल्या तुघलकांचा पराभव करणाऱ्या राजस्थानच्या भूमितील राणा कुंभा, राणा सांगा यांनी केलेल्या पराक्रमाचे वर्णन बुवांनी केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत आशिष आठवले यांनी अचूक उत्तर दिले. याबद्दल त्यांचा बुवांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.