क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम पट्टा
क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

sakal_logo
By

rat०६२२.txt

(पान ३ साठी)

बेशुद्ध वृद्धाचा मृत्यू

दाभोळ ः दापोली शहरातील स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला बंद इमारतीच्या गाळ्यात ६० वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत अढळून आला. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शंकर धावले (रा. नानटे कांबळेवाडी) हे बेशुद्धावस्थेत पडलेले होते. तेथील स्थानिक लोकांनी उपचाराकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आणले. तेथे त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. याची माहिती काशिनाथ धावले यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत.
---

दर्शनासाठी आलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथे पालखी सोहळ्यासाठी आलेल्या रायगड येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजाता पाली येथील ग्रामीण रुग्णालयात घडली. मधुकर दगडू टेंभे (वय ५२, रा. लोणेरे माणगाव, रायगड) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. टेंभे हे गुरुवारी नाणीज जुना मठ येथे पालखी सोहळ्यासाठी आले होते. सायंकाळी त्यांच्या छातीत आणि पाठीत दुखू लागल्याने त्यांना मठासमोरीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु त्यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्या नातेवाइकांनी अधिक उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टेंभे यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


आकडी आल्याने प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात आंघोळ करताना अचानकपणे आकडी आल्याने प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ५) जानेवारीला सायंकाळी घडली. संदीप विठ्ठल कुरटे (वय ४८, रा. वरची निवेंडी पातेवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ते गणपतीपुळे येथील समुद्रात आंघोळ करत होता. त्या वेळी त्याला आकडी आल्याने त्याच्या नाका-तोंडातून फेस येऊ लागला. तो पाण्यात बुडत असताना तेथील नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर देवस्थानच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुरटेला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--

गांजाचे सेवन करणाऱ्यास दंड

रत्नागिरी ः गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याला न्यायालयाने ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अडीच महिन्यांपूर्वी हेड पोस्ट ऑफिस ते जुने भाजीमार्केट रस्त्यावरील शाळेच्या गेटच्या आडोशाला हा प्रकार घडला. मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (३२, रा. वरचा मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार १६ ऑक्टोबर २०२२ ला ते वरचा फगरवठार ते हेड पोस्टऑफिस ते काँग्रेस भवन, अशी गस्त घालत होते. रात्री त्यांना हेड पोस्टऑफिस ते जुने भाजीमार्केट रस्त्यावरील शाळेच्या गेटच्या आडोशाला मोहम्मद मस्तान गांजाचे सेवन करताना आढळला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहीले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी मोहम्मद मस्तानला ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.