माझी वसुंधरा अभियानासाठी ग्रामकृती गटाची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझी वसुंधरा अभियानासाठी ग्रामकृती गटाची स्थापना
माझी वसुंधरा अभियानासाठी ग्रामकृती गटाची स्थापना

माझी वसुंधरा अभियानासाठी ग्रामकृती गटाची स्थापना

sakal_logo
By

rat०६३७.TXT

(पान ३ साठी)

माझी वसुंधरा अभियानासाठी ग्रामकृती गट

१०५ ग्रामपंचायतींची निवड; मूल्यमापन ३१ एप्रिलपर्यंत होणार
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ६ ः माझी वसुंधरा अभियानात जमिन, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी गावोगावी ग्रामकृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे मूल्यमापन ६ ते ३१ एप्रिलपर्यंत केले जाणार आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर कर्मचाऱ्‍यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावर एकत्रित चर्चा करून माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध उपाययोजना आखणे, योजनांची अंमलबजावणी, निधीसाठी पाठपुरावा, स्वयंसंस्थांची मदत, विविध मुद्द्यांची डॉक्युमेंटेशन आदी कार्यवाही करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मूल्यमापनात यशस्वी ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्षेत्रीय मूल्यमापन २ ते २५ मे या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरणदिनी निकाल व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ग्रामकृती गटाने दर सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करावी. पंचतत्त्वावर आधारित मूल्यमापन तक्त्यानुसार कामगिरी करण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही ग्रामकृती गट करतील. तालुकास्तरीय नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच क्षेत्रीय संनियंत्रण अधिकाऱ्‍यांशी समन्वय राखून ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करावे लागणार आहे.
--

तालुका*ग्रामपंचायती
मंडणगड*५
दापोली*११
खेड*१३
चिपळूण*१४
गुहागर*७
संगमेश्वर*११
रत्नागिरी*२२
लांजा*७
राजापूर*१५
---

ग्रामकृती गटाचे अध्यक्ष सरपंच
गावातील ग्रामकृती गटाचे सरपंच, अध्यक्ष तर उपसरपंच, तलाठी, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा, मुख्याध्यापक माध्यमिक शाळा, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, पोलिसपाटील, वनरक्षक, वायरमन, लाईनमन, ग्रामरोजगार सेवक, अध्यक्ष स्वयंसहाय्यता गट, आपले सरकार सेवा केंद्र चालक, स्वस्त धान्य दुकानचालक, उमेद प्रेरिका, अध्यक्ष युवक मंडळ, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी हे सदस्य तर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.