राजापूर-जैतापुरला आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-जैतापुरला आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
राजापूर-जैतापुरला आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

राजापूर-जैतापुरला आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

sakal_logo
By

जैतापुरला आज मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
राजापूर, ता. ६ ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पहिले महामानव (कै.) भागोजीशेठ कीर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जैतापूर येथे शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८) वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा अलका नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
कोकणातील पहिलेच साहित्य संमेलन असून जैतापूर एज्युकेशन सोसायटी, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, राजापूर तालुका जनता परिषद, अखिल भारतीय भंडारी महासंघ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त आयोजनाने पार पडत आहे. (कै.) भागोजीशेठ कीर यांचे सामाजिक कार्य समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचावे यासाठी जैतापूर नगरीत हे संमेलन आयोजित केल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. अल्का नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडणार आहे.
जैतापूर एज्युकेशन सोसायटीच्या जैतापूर हायस्कूलच्या प्रांगणात पार पडणाऱ्या या संमेलनाची सुरवात ७ जानेवारीला सकाळी ८.३० वा. ग्रंथदिंडीने होणार असून, सकाळी १०.३० वा. या संमेलनाचे उद्घाटन पार पडणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी १ वाजण्याच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वा. स्थानिक कवींच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ८ जानेवारीला सकाळी १० वा. कवितावाचनाचा कार्यक्रम होऊन दुपारी ३ वा. समारोपाच्या कार्यक्रमाची सुरवात होणार असल्याची माहिती या परिषदेमध्ये डॉ. अल्का नाईक यांनी दिली. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष शरद गोरे व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर हे उपस्थित होते.