
मुणगेत देवी भगवतीच्या जत्रोत्सवास सुरुवात
73717
मुणगे ः येथील देवी भगवतीच्या जत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी व देवीची ओटी भरण्यासाठी देवी भगवती मंदिरामध्ये झालेली भाविकांची गर्दी. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)
मुणगेत देवी भगवतीच्या
जत्रोत्सवास सुरुवात
मुणगे ता. ६ ः येथील देवी भगवतीच्या जत्रोत्सवास आजपासून सुरुवात झाली. सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. गेली दोन वर्ष कोविडमुळे निर्बंध असल्याने भाविकातून नाराजी व्यक्त झाली होती. परंतु, यावर्षी मोठ्या उत्साहात जत्रोत्सव साजरा होत आहे.
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सवाला आज (ता.६) पासून सुरुवात झाली आहे. हा जत्रोत्सव सोहळा पाच दिवस मोठ्या गर्दीत साजरा होत असतो. पाचव्या दिवशी (ता.१ ) उत्तर रात्रीनंतर लळीताचे कार्यक्रमाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची ख्याती असल्याने दुरदूरचे भक्तजन देवीच्या दर्शनासाठी आतुरतेने जत्रोत्सवाला येत आहेत. देवगड-मालवण मार्गावरच देवीचे मंदिर असल्याने जत्रोत्सवाशिवाय इतर दिवशी सुध्दा भाविक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. घाटमाथ्यावरील शालेय सहली या ठिकाणी येते आहेत. देवीचे पहिले श्रध्दास्थान म्हणून बांबरवाडी येथील देवी बायची ही सुध्दा ग्रामदेवता होती. या बायची देवीच्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम देवी भगवती देवस्थान समितीने हाती घेतले आहे. यासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. देणगीदार, हितचिंतकांनी जिर्णोद्धारासाठी मदत करावी, असे आवाहन देवी भगवती देवस्थान समितीने केले आहे.