
लांजा ः लेखणीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक
फोटो ओळी
-rat६p२८.jpg - KOP२३L७३७१५
लांजा ः लांजा तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजन साळवी
------------
लेखणीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक
--
आमदार राजन साळवी ; लांजा तालुका पत्रकार संघाचे कौतूक
लांजा, ता. ६ ः राजकीय मंडळी काम करत असताना चुकत असतात; परंतु या चुका लेखणीद्वारे दाखवण्याचे काम पत्रकार करत असतात. लांजा तालुका पत्रकार संघ लेखणीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जपणूक करत गेली ३० वर्षे गुणवंतांचा गौरव करून शाबासकीची थाप देण्याचे काम करत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून लांजा तालुका पत्रकार संघ व कल्पना कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी लांजा येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी साळवी म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पत्रकारितेचे योगदान फार मोठे आहे. पत्रकारिताही आपली ताकद आहे. ती अविरतपणे सुरू राहिली पाहिजे. लांजा तालुका पत्रकार संघाने हा वारसा जपला असून, यापुढेही अशाच पद्धतीने त्यांनी काम करावे.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापूर म्हणाले, देशामध्ये हुकूमशाही पद्धतीची वाटचाल सध्या सुरू आहे. अशा गोष्टींवर पत्रकारांनी सडेतोड लिखाण केले पाहिजे. पत्रकारांबाबत सर्वांना आदरयुक्त भीती वाटते. ती भीती अशाच पद्धतीने वाटली पाहिजे, असे भविष्यात पत्रकारांनी काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले
लांजा तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, न्यु एज्युकेशन सोसायटीचे सीईओ श्रीराम तथा भाऊ वंजारे, अध्यक्ष जयवंत शेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापूर, लांजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप मुजावर, कल्पना कॉलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण, तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी नगरसेवक शेखर सावंत, लांजा राजापूर नागरी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
चौकट
तीन विद्यार्थ्यांचा सत्कार
या वेळी नासा व इस्रो पाहणीसाठी निवड झालेल्या आशिष गोबरे, वेदिका वारंगे, आर्यन गुरव या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली तर श्रुतिका शिंदे, दिव्या भायजे, नम्रता पाटोळे, मयुरी नरसळे, अक्षता घाडी, दुर्वा चव्हाण,लतिका जाधव, वृणाली घाणेकर यांनी व्यावसायिक शिक्षणात उज्ज्वल यश संपादित केल्याने त्यांचा गुणगौरव करण्यात आला.