
पालशेतमध्ये सरपंच, सदस्य व ग्रामस्थांमध्ये हाणामारी
rat०६३३.txt
( पान ३)
सरपंच, सदस्यांची ग्रामस्थांसोबत हाणामारी
पालशेतमधील प्रकार ; परस्परविरोधी तक्रार दाखल
सकाळ वृत्तसेवा ः
गुहागर, ता. ५ ः तालुक्यातील पालशेत गावातील एका शाळेच्या शौचालय दुरुस्तीसंदर्भात ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसणार होते. या उपोषणावरून ग्रामस्थ आणि पालशेतचे सरपंच व सदस्य यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत.
ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे यांनी ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे औषधोपचार करताना तक्रार दाखल केली. यामध्ये बेकायदा वाळू उपशाचा संदर्भ जोडून नागवेकरबंधूंनी मारहाण केल्याचे म्हटले आहे तर उपोषणात भाग घेऊ नये म्हणून पालशेतच्या सरपंच संपदा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे आणि संदीप चव्हाण यांनी विनापरवाना घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली, अशी तक्रार विजय नागवेकर यांनी गुहागर पोलिस ठाण्यात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुन्हागर पोलिस ठाण्यातील अमंलदार गणेश कादवडकर अधिक तपास करत आहेत
-------------