
भाजलेल्या युवतीचा उपचारावेळी मृत्यू
भाजलेल्या युवतीचा
उपचारावेळी मृत्यू
सावंतवाडी, ता. ५ ः पेटता दिवा कपड्याला लागून गंभीरित्या भाजलेल्या सोनुर्ली येथील युवतीचे उपचारादरम्यान ३१ डिसेंबरला मृत्यू झाला. लीला कमळाजी नाईक (वय २९ रा. सोनुर्ली-पाक्याचीवाडी), असे तिचे नाव आहे. आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
संबंधित युवती २२ डिसेंबरला न्हाणी घरात पेटता दिवा घेऊन जात असताना तो कपड्याला लागल्याने गंभीररित्या भाजली होती. यावेळी तिच्यावर सावंतवाडी रूग्णालयात प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर गोवा-बांबुळी येथे तिच्यावर अधिक उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. याबाबत आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती न्हाणी घरात पेटता दिवा घेऊन जात असताना तिच्या कपड्यांनी पेट घेतल्यामुळे ती गंभीरित्या भाजली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला सावंतवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तिला तात्काळ गोवा-बांबुळी येथे हलविले होते. त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला.