‘ते’ शिक्षक अजूनही बेपत्ताच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ते’ शिक्षक अजूनही बेपत्ताच
‘ते’ शिक्षक अजूनही बेपत्ताच

‘ते’ शिक्षक अजूनही बेपत्ताच

sakal_logo
By

‘ते’ शिक्षक अजूनही बेपत्ताच
सावंतवाडी ः तालुक्यातील कलंबिस्त हायस्कुलचे बेपत्ता झालेले शिक्षक राजेश शशिकांत पाटकर यांचा चौथ्या दिवशी देखील शोध लागला नाही. येथील पोलिसांनी बाबल अल्मेडा यांच्या मदतीने कुणकेरी भागात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र, ते सापडले नाहीत. कलंबिस्त हायस्कुलचे शिक्षक राजेश पाटकर हे सोमवार सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. चार दिवस झाले तरी त्यांचा शोध घेण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले नाही. गुरुवारी (ता.४) त्यांचा पोलिसांनी कुणकेरी भागात शोध घेतला. त्यांचे मोबाईल लोकेशन कुणकेरी येथे मिळाले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल घरात बंद अवस्थेत आढळून आला. त्या धर्तीवर पोलिस यंत्रणा कामाला लागली असून सर्वत्र शिक्षक पाटकर यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी दिली.