साळगावात लाकडे जळून नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळगावात लाकडे जळून नुकसान
साळगावात लाकडे जळून नुकसान

साळगावात लाकडे जळून नुकसान

sakal_logo
By

साळगावात लाकडे जळून नुकसान
कुडाळ ः मुंबई-गोवा महामार्गावरील साळगाव येथील सतीश साळगावकर यांच्या मालकीच्या लाकडांना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. गिरणीसाठीचे लाकूड साळगाव हायस्कूल नजीक रस्त्यालगतच्या जागेत ठेवले होते. लाकडे वाळलेली असल्याने आग भडकली. कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसी अशा दोन अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली. या आगीत अंदाजे साठ ते सत्तर हजाराची लाकडे जळून नुकसान झाले. साळगावकर यांनी लाकूड गिरणीसाठीची लाकडे आपल्या जागेत ठेवली होती. लाकडांना आग लागल्याचे लक्षात येताच साळगावकर यांनी अग्निशमन बंबांना पाचारण केले. बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग आटोक्यात आणली; अन्यथा सर्व लाकडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.
--------------
दोडामार्गातील रस्त्यांची दुरवस्था
दोडामार्ग ः कसई-दोडामार्ग शहरात नगरपंचायत हद्दीतील राज्यमार्ग क्र.१८६ व राज्यमार्ग १८९ च्या झालेल्या दुरवस्थेकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी निवेदन देत लक्ष वेधले. या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. हे दोन्ही मुख्य राज्यमार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जातात. नगरपंचायत हद्दीतील हे मुख्य रस्ते सद्यस्थितीत खड्डेमय बनले असून नागरिक व पर्यटकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. नगरपंचायत हद्दीत मुख्य चौकातील याच राज्यमार्गालगत खासगी कंपनीकडून गॅस पाईपलाईनसाठी खोदाईचे काम सुरू असून त्यामुळे रस्त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. पिंपळेश्वर दोडामार्ग हॉलकडील मोरी व राज्यमार्गालगत मोरींची दुरुस्ती होणे गरजेचे असून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.