सातार्डा येथील शिबिरात ३२ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातार्डा येथील शिबिरात
३२ जणांचे रक्तदान
सातार्डा येथील शिबिरात ३२ जणांचे रक्तदान

सातार्डा येथील शिबिरात ३२ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

73806
सातार्डा ः रक्तदान शिबिरात संजय पिळणकर यांना आभारपत्र देताना गोवा रक्तपेढीचे अधिकारी.

सातार्डा येथील शिबिरात
३२ जणांचे रक्तदान
बांदा ः गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सातार्डा-देऊळवाडी येथे प्राथमिक शाळा नं १ येथे नुकत्याच झालेल्या या शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. जीएमसीच्या (गोवा) रक्तपेढी विभागाने शिबिर आयोजनासाठी आवाहन केले होते. त्यामुळे तातडीने पिळणकर यांनी शिबिर घेतले. रक्तदात्यांमध्ये २ महिलांचाही सहभाग होता, तर ३ दाते हे निगेटिव्ह गटाचे होते. रक्तदान शिबिरास रवळनाथ मित्रमंडळ सातार्डाचे सहकार्य लाभले. सलग दोन दिवस दोडामार्ग व सातार्डा येथे दोन रक्तदान शिबिरे घेतल्याने जीएमसी ब्लड बँकेच्या टीमने पिळणकर यांचे आभार मानले. सरपंच संदीप ऊर्फ बाळू प्रभू, जीएमसी रक्तपेढीचे डॉ. संजय, सिंधू रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेंगुर्लेकर, सागर नाणोसकर, अॅड. संदीप चांदेकर, मुख्याध्यापक गावित, संजय पिळणकर, अक्षय मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले.