सावंतवाडीत पालिकेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत पालिकेतर्फे
कापडी पिशव्यांचे वाटप
सावंतवाडीत पालिकेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप

सावंतवाडीत पालिकेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप

sakal_logo
By

73807
सावंतवाडी ः पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना पिशवी देताना कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर.

सावंतवाडीत पालिकेतर्फे
कापडी पिशव्यांचे वाटप
सावंतवाडी, ता. ७ ः प्लास्टिकचा वापर टाळून जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करा, असा संदेश जिल्हा प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात पालिकेचे आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांनी केला. या वेळी उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी आघाडीवर असलेल्या सावंतवाडी पालिकेने प्लास्टिक पिशव्या वापर बंदीच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. त्या बदल्यात ग्लोबल रिसायकल स्टॅंडर्ड जीआरएस यांच्याकडून प्रमाणित असलेल्या व बाजारात उपलब्ध असलेल्या या पिशव्या संबंधित कंपनीकडून खरेदी केल्या असून त्या नागरिकांना वाटप केल्या जात आहेत. नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे हा मूळ उद्देश ठेवून पालिका हा उपक्रम राबवित आहे. पालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमास आरोग्य अधिकारी नाडकर्णी यांनी या पिशव्या प्रभारी तहसीलदार अरुण उंडे, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब यांच्यासह उपस्थित पत्रकार बांधवांना दिल्या. या वेळी पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर उपस्थित होत्या.