नीलेश राणेंनी पेंडूर येथे घेतले दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीलेश राणेंनी पेंडूर येथे घेतले दर्शन
नीलेश राणेंनी पेंडूर येथे घेतले दर्शन

नीलेश राणेंनी पेंडूर येथे घेतले दर्शन

sakal_logo
By

73809
पेंडूर ः मांड उत्सवास माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट देत दर्शन घेतले.

नीलेश राणेंनी पेंडूर येथे घेतले दर्शन
मालवण : पेंडूर येथे सुरू असलेल्या १४ दिवसांच्या देवीच्या मांड उत्सवास माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, पेंडूर सरपंच सुनीता मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य सुमित सावंत, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, अंकिता सावंत, शेखर फोंडेकर, सोसायटी चेअरमन दीपा सावंत, संजय नाईक, आपा सावंत, संदेश नाईक, भाऊ पटेल, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विनायक सावंत-पटेल, सचिव अमित रेगे-कुलकर्णी, बिपीन परब, देवस्थान ट्रस्ट संचालक दादा नाईक, अमित सावंत, सागर माळवदे, दयानंद चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.