Sun, Jan 29, 2023

कुडाळ इंग्लिश मीडियमचे यश
कुडाळ इंग्लिश मीडियमचे यश
Published on : 7 January 2023, 2:56 am
73811
आदित्य कांबळे, आयुष कारेकर
कुडाळ इंग्लिश मीडियमचे यश
कुडाळ ः महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म.शि.प्र. मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत आदित्य कांबळे व आयुष कारेकर यांनी शिष्यवृत्ती पटकावली आहे. पाचवीमधून आदित्य याने शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३५ वा क्रमांक, तर आयुष याने शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात ५० वा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख, शिक्षिका पूर्वी राऊळ, कविता साबलपरा, स्नेहा परुळेकर, झेबा आवटे, भगवान केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले.