गाळ काढण्याबाबत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळ काढण्याबाबत बैठक
गाळ काढण्याबाबत बैठक

गाळ काढण्याबाबत बैठक

sakal_logo
By

rat०७१०.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

गाळ काढण्यासंदर्भात बैठक

चिपळूण ः चिपळूणच्या नद्यांमधला गाळ काढण्याची मागणी करण्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत प्रशासनाची तत्काळ बैठक लावण्याची सूचना आमदार शेखर निकम यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात प्रांताधिकारी, तहसीलदार, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक तातडीची बैठक लावण्याच्या हालचाली आमदार शेखर निकम यांनी सुरू केल्या आहेत. या बैठकीमध्ये जलसंपदा विभागातर्फे आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील कामाची दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे चिपळूण बचाव समितीने इशारा दिल्यानंतर २६ जानेवारीला उपोषणाची तयारी सुरू ठेवली आहे. ज्या संघटनांनी बचाव समितीच्या उपोषणाला पाठिंबा दिला त्या सर्व संघटनांची बैठक लवकरच होणार आहे, अशी माहिती बचाव समितीकडून देण्यात आली.
-

फोटो ओळी
-rat७p३.jpg ः
७३७९०
खेर्डी ः नाचणी व वरीपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे प्रात्यक्षिकासह माहिती देताना.
---------
खेर्डीत पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम

पावस ः तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ्य आहारातील महत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात झाला. तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांनी पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यातील महत्व सांगितले. कृषी सहाय्यक जे. के. काते यांनी नाचणी व वरी लागवडीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथील प्रा. साळवी यांनी पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया उद्योगातील संधी व प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर रूची फूड्सच्या मालप यांनी उपस्थितांना नाचणी व वरीपासून तयार होणारे विविध पदार्थ प्रत्यक्षिकाद्वारे बनवून दाखवले.
---
फोटो ओळी
-rat७p१२.jpg ः
७३८२०
मिळंद (ता. राजापूर) ः जनजीवन मिशनसाठी घेण्यात आलेल्या सभेला उपस्थित महिला.
----
मिळंदमध्ये ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम

पावस ः राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मिळंद-सावडावमार्फत ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक वाडीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच कीर्ती आयरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक वाडीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांचा चांगला सहभाग मिळाला. या वेळी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन शेड व रोजगार हमी योजनेतून नॅडप खतखड्डा, गांडूळखत खड्डा, शोषखड्डे या विषयीची सविस्तर माहिती व त्यांना मिळणारे अनुदान याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजनेची माहिती देऊन ५ टक्के लोकवर्गणी भरण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच इतर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
---

फोटो ओळी
-rat७p७.jpg ः
७३७९४
हर्णै ः पत्रकारदिनानिमित्त उपस्थित आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे मान्यवर

--
वराडकर-बेलोसे महाविद्यालयामध्ये पत्रकारदिन

हर्णै ः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या १९१व्या जयंतीनिमित्त दापोलीतील वराडकर-बेलोसे महाविद्यालयामध्ये मराठी पत्रकारदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सभापती श्रीमती जानकी बेलोसे व कार्यवाह डॉ. दशरथजी भोसले व प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड व मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित होते. पत्रकारदिनानिमित्त दापोली येथील कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन संस्था सभापती जानकी बेलोसे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांनी संस्थेने जुन्या जाणकार मंडळींबरोबरच नवीन उपाध्यक्ष आदित्य बेलोसे व संचालक सुनील चव्हाण यांची निवड केल्याचे सांगितले.
--

फोटो ओळी
-rat७p८.Jpg ः
७३७९५
आरवली ः आंगवली हायस्कूलचे मुख्याध्यापक चव्हाण यांच्याकडून विज्ञान प्रदर्शनसंबंधी दप्तर स्वीकारताना मुख्याध्यापक पी. डी. राऊत सोबत मान्यवर.
-
संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन

आरवली ः जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती संगमेश्वर व शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब यांच्या संयुक्त विद्यमाने ५०वे संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन रविवारपासून (ता. ८) कोसुंब येथे सुरू होत आहे. ''तंत्रज्ञान व खेळणी'' हा विज्ञान प्रदर्शनाचा विषय आहे. रविवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत नोंदणी व विज्ञानसाहित्य मांडणी, ९ ला सकाळी १०.३० वाजता उद्घाटन, ११.३० ते ४ वाजेपर्यंत प्रश्नमंजूषा व विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, १० ला दुपारी १.३० ते ४ बक्षीस वितरण व समारोप, प्रदर्शनात प्राथमिक गट सहावी ते आठवी, माध्यमिक गट नववी ते बारावी असे विद्यार्थांसाठी विज्ञान प्रतिकृतीसाठी गट असून प्रश्नमंजूषा स्पर्धा आठवी व नववी वर्गासाठी आहे. अध्यापक निर्मित विज्ञानसाहित्य व प्रयोगशाळा परिचरनिर्मित विज्ञानसाहित्य या विभागातही विज्ञान प्रतिकृती मांडल्या जातील.
--