
पर्यटनवाढीसाठी मारळ नगरीत 13 व 14ला मार्लेश्वर महोत्सव
rat०७६.txt
(पान ६ साठीमेन)
(टीप- दोन बातम्या आहेत. याच्या खाली असलेली बातमी या बातमीच्या पोटात घ्यावी.)
फोटो ओळी
-rat७p११.jpg-
७३८१९
देवरूख ः मार्लेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी उभारलेली स्वागत कमान.
---
पर्यटनवाढीसाठी मारळ नगरीत मार्लेश्वर महोत्सव
माजी राज्यमंत्री रवींद्र माने; सुधारणांसाठी आराखडा तयार
सकाळ वृत्तसेवा ः
साडवली, ता. ७ ः संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्घ असलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर हे क दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. त्याचा अधिक विकास व्हावा व पर्यटक, भाविकांचे येणे-जाणे वाढावे यासाठी आपण पुढाकार घेत असून याचाच एक भाग म्हणून १३ व १४ जानेवारीला मारळनगरीत आपण दोन दिवसांचा मार्लेश्वर महोत्सव भरवणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यानी पत्रकार परिषदेत केली. कोकणातील लोककलांचा हा महोत्सव असणार आहे.
या महोत्सवाची संकल्पना युवा नेतृत्व प्रद्युम्न माने यांची असून रवींद्र माने, नेहा माने यांच्या नियोजनात हा महोत्सव रंगणार आहे. उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संगमेश्वर तालुका व मारळमधील ग्रामस्थ आणि देवनगरी देवरूख क्रांती व्यापारी संघटना यासाठी सहकार्य करणार आहेत. महोत्सवात समर्थकृपा प्रॉडक्शन रत्नागिरी प्रस्तुत ''कोकणचा साज संगमेश्वरी बाज'' या कार्यक्रमाबरोबरच हार्मोनियम सोलोवादन, जाखडी नृत्य, शाहिरी, खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार आहे. १३ तारखेला रात्री ७ वा. खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने स्थानिकांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार आहेत. मार्लेश्वर परिसरातील सोयीसुविधा तसेच धारेश्वर धबधब्याकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग अशा अनेक सुधारणा करण्यासाठी आराखडा तयार केला असून शासनाच्या माध्यमातून यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली.
--
यात्रेच्या तयारीचा प्रशासनाकडून आढावा
१५ ला देवांचा विवाह ; १३ पासून यात्रा
देवरूख, ता. ७ ः संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले श्री देव मार्लेश्वर यात्रेचे वेध सर्व भाविकांना लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार सुहास थोरात यांची देवस्थानचे मानकरी, गावकरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पोलिस यांच्यासमवेत तहसील कार्यालयात आढावा बैठक झाली.
यावर्षी मार्लेश्वर यात्रा १३ ते १५ या कालावधीत आहे. १५ ला मार्लेश्वर व गिरिजा देवी यांचा विवाह होणार आहे. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळाव्यात व त्यांचा प्रवासही सुखकर व्हावा यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असलेल्या मानकरी, कुमकरी यांच्यासह भाविक यांची गैरसोय न होता सर्व यात्राकाळात दरवर्षीप्रमाणे गडबड गोंधळ न होता सर्व नियोजन करून यात्रा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आपपली जबाबदारी ओळखून काम करून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.