
मनोज जोगळेकर यांना विज्ञानमित्र पुरस्कार
rat०७९.txt
बातमी क्र..९ (पान २ साठी)
फोटो ओळी
-rat७p२.jpg ः
७३७८९
गुहागर ः विज्ञानमित्र पुरस्काराने मनोज जोगळेकर यांना गौरवताना अंतराळवीर आरती पाटील.
---
मनोज जोगळेकर यांना विज्ञानमित्र पुरस्कार
गुहागर, ता. ७ ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरी शृंगारी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून पालशेतकर विद्यालयातील विज्ञानशिक्षक मनोज जोगळेकर यांना विज्ञानमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले. गेली दोन वर्षे ते रयत शिक्षणसंस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
जोगळेकर हे श्रीमती र. पां. पालशेतकर विद्यालय, पालशेतमध्ये कार्यरत असताना जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर व गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळामार्फत आयोजित विज्ञानरंजन स्पर्धा, विज्ञान मंडळ स्पर्धा परीक्षा, संगणक संबोध परीक्षा (CCE) NTS, NMMS कार्यशाळा, विज्ञानप्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतात. तालुका, जिल्हा व राज्यापर्यंत विज्ञान उपकरणाची निवड, अखिल भारतीय विज्ञानमेळावा, वैज्ञानिक आकृती रेखाटन व विज्ञान व गणित विषयाचे रिसोर्स पर्सन म्हणून त्यांचा सहभाग होता. हरित सेनाअंतर्गत वृक्ष संवर्धन व लागवड प्रकल्प, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो.
लखनौला झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात ते विद्यार्थ्यांसोबत सहभागी होते. विज्ञान विषयांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी व समाजामध्ये विज्ञान विषयाची जाणीव व जागृती दृढ करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या या कामाची दखल घेत विज्ञानमित्र पुरस्काराने, अंतराळवीर आरती पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.