
सदर
rat०७४.txt
बातमी क्र..४ (पान ६ किंवा २ साठी)
(१ जानेवारी पान सहा)
आख्यायिकांचे आख्यान...............लोगो
फोटो ओळी
-rat७p६.jpg ः
७३७९३
धनंजय मराठे
--
आख्यायिका यमाचा दरबार
प्राचीन मंदिरं म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रं. या मंदिरांमधून अनेक विभाग कार्यरत असतात. वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, कीर्तनकला, ध्यानमंदिर, पाठशाळा इ. अनेक प्रकारांचा समावेश देवळांत असतो. मंदिरे मानवी मनावर संस्कार करतात. वाईट विचारांपासून मन लांब जाते. सकारात्मक दृष्टिकोन घेऊन भक्त या ठिकाणाहून जातात. यातील एक धोपेश्वर हे राजापूरमधील जागृत देवस्थान. या देवळाच्या नगारखान्यापासूनच संस्काराची सुरवात होते असे. या नगारखान्यात देवादिकांची युद्ध, प्रसंगाची अशी चित्रं रेखाटलेली दिसत असत. आज जीर्णोद्धार, दुरुस्ती नावाखाली ही पुरातन वारसाचित्र नाहीशी झाली हे मात्र खरं!
बाल्यावस्थेत आजी-आजोबांकडून या चित्रांच्या कथा ज्यांनी ऐकल्या त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले असणार हे नक्कीच! धोपेश्वरच्या मृडानी नदीचा ओसंडून कोसळणारा धबधबा पाहताना आपल्या पाठीमागील देवळाच्या भिंतीवर कोळशाने काढलेले कुंभकर्णाचे भलेमोठे चित्र होते. दहा-पंधरा फुटी हा अजस्त्र निद्रिस्त रावण. हे आबालवृद्धांचे आकर्षण होते. हे चित्र काय आहे हे एक आजी तिच्याबरोबरच्या तिच्या सहा -सात वर्षाच्या नातवाला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील, असे समजावत सांगत होती. रामायणात रामाबरोबर रावणाचे युद्ध झाले, रावणाची अनेक राक्षसं, योद्धे, भाऊ मारले गेले. आता मात्र कुंभकर्ण एकटाच राहिला. आजी बोटाने निर्देशित करत हा कुंभकर्ण सहा महिने झोपायचा, सहा महिने जागा आसायचा. आता हा झोपलेला कुंभकर्ण काय हाका मारून जागा होईल काय? तर त्याला उठवण्यासाठी त्याच्या कानात हे राक्षस पिपाण्या वाजवतायतं, कोणी ढोलताशे वाजवतंय, झांजा वाजवतायंत, कोण छाती-पोटावर नाचतायंत, कोणी पाय ओढतायंत, कोणी किंचाळतायंत, असे करून त्याला युद्धासाठी उठवण्याचा प्रयत्न करतायंत, असे हे चित्र आहे. आजीचे चित्रकथन संपत आले तरी मुलाची प्रश्नावली चालू होती.
याच देवळाच्या नगारखान्याच्या आत देवडीत बसायला कट्टे होते. या देवडीच्या भिंतीवर काही विलक्षण चित्रं होती. मुलाची उत्सुकता याही चित्राबाबत होती. बालहट्ट चालू होता. आजी एकेक चित्र समजावत सांगत होती. हा गणपती बाप्पा, हा शंभू महादेव एकना अनेक चित्र होती; पण एका चित्राकडे मुलाचे चित्त स्थिर होतं. आजी याही चित्रांचे वेगळेपण सांगत अरे बाळा हा "यमाचा दरबार" ज्या वेळी माणूस देवाघरी जातो त्या वेळी त्याला यमाचे दूत त्याला घेऊन प्रथम यमाच्या दरबारात नेतात. तिथे त्याने जिवंतपणी काय पापं केली, काय पुण्य केले ते यमाचे सेवक त्याने केलेली पुण्य कामं आणि वाईट कामं यमराजाला सांगतात. माणसाचा खांद्यातील बाहुत माणूस जन्माला येतो तेव्हा यमाचे सेवक येऊन बसतात आणि ते यमाच्या दरबारात हे सेवक जे काही आपण जिवंतपणी वागलो ते ते सर्व चांगले-वाईट यमराजाला सांगतात.
चांगली कर्म केलेल्यांना यमराज स्वर्गात पाठवतात आणि वाईट कर्म केलेल्यांना यमाचे सेवक तापलेल्या तळणीत तळतात. कोणाला चाबकाचे फटके मारतात, काहींना काठीने बदडतात असे किती वाईट कर्म केली त्याप्रमाणे त्या तागडीत तोलून त्याप्रमाणे शिक्षा करतात. म्हणून चांगले वागावे नाहीतर यमराज तापलेल्या तळणीत तळून काढतो. देवळं आपल्या मनावर चांगले संस्कार करतात हेच खरं! असा हा चित्रंरूपातील यमाचा दरबार ज्यांनी पहिला ते धन्य!
(लेखक )
manojmarathe४@gmail.com