वेंगुर्लेत २५ ला क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत २५ ला क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्लेत २५ ला क्रिकेट स्पर्धा

वेंगुर्लेत २५ ला क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

फोटो ओव्हरसेट
73643
सरंबळ ः येथे शाळेतील मुलांना मसाला दूध वाटप करण्यात आले.

सरंबळ शाळेत दूध वाटप
कुडाळ ः सिंधुरत्न भूमि प्रतिष्ठान सरंबळ यांच्या मंडळातर्फे महिला मुक्तीदिन, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन यांचे औचित्य साधून सरंबळ शाळेतील मुलांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक १ देऊळवाडी पूर्ण प्राथमिक शाळा, सरंबळ इंग्लिश स्कूल, नाईकवाडी शाळा, जिल्हा परिषद तळेकरवाडी शाळा या सर्व शाळेतील मुलांना दुध वाटपचा कार्यक्रम मंडळातर्फ करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल सुतार, अध्यक्ष सचिन पुजारी, उपाध्यक्ष दिपाली मेस्त्री, सचिव नयना सुतार, इतर सदस्य आणि सरंबळ गावचे सरपंच रावजी कदम आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
---
वेंगुर्लेत २५ ला क्रिकेट स्पर्धा
वेंगुर्ले ः वेंगुर्ले लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन व गवंडे अ‍ॅकेडमी वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ला वेंगुर्ले कॅम्प पॅव्हेलियम येथील क्रीडा मैदानावर २१ वर्षांखालील खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या २१ वर्षांखालील म्हणजे १ जानेवारी २००१ नंतर जन्म झालेल्या खेळाडूंनी उद्या (ता. ८) सकाळी १० कॅम्प मैदान येथे नाव नोंदणीसाठी आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी राजू गवंडे यांच्याशी संपर्क साधावा.
----------------
कुडाळमधून १८ ला पायी दिंडी
कुडाळ ः आपासो वासकर महाराज (पंढरपूर) यांच्या फडातर्फे गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज (दादा) यांच्या प्रेरणेने पायी माघवारी दिंडी सोहळा १८ ते ३० जानेवारी या कालावधीत होणार आहे. या दिंडीची सुरुवात १८ ला सकाळी ११ वाजता येथील येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथून होणार आहे.