प्रलंबित प्रश्नांकडे वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित प्रश्नांकडे वेधले
उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष
प्रलंबित प्रश्नांकडे वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

प्रलंबित प्रश्नांकडे वेधले उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

sakal_logo
By

73835
नागपूर ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

प्रलंबित प्रश्नांकडे वेधले
उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष
पुरस्कारप्राप्त शिक्षक संघटनेची भेट

तळेरे, ता. ७ : राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेत विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनातर्फे दोन जादा वेतनवाढी देण्यात येत होत्या; परंतु २०१४ पासून त्या बंद केल्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शासनाकडे आमदार, खासदारांमार्फत निवेदन देऊनही मागणी संबंधित शिक्षकांनी शासनाकडे मांडली आहे‌. संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन देऊन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षण सचिव यांचेही लक्ष वेधून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. पुरस्कारप्राप्त शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बळीराम चापले, सुनील नायक, माया गेडाम, सुरेश गेडाम, माधव वायचाळ, सुनील गुरव, प्रदीप बिबटे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन दिली. यावेळी प्रश्न सकारात्मकतेने सोडविण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी दिली.