आयुष्यभर विद्यार्थी राहून शिक राहावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुष्यभर विद्यार्थी राहून शिक राहावे
आयुष्यभर विद्यार्थी राहून शिक राहावे

आयुष्यभर विद्यार्थी राहून शिक राहावे

sakal_logo
By

rat०७२४.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat७p१४.jpg-
73843

रत्नागिरी ः डॉ. अलिमियाँ परकार यांचा सन्मान करताना मंदार सावंतदेसाई. डावीकडून स्वप्नील सावंत, स्नेहा कोतवडेकर, प्रसन्न दामले, दीपक जोशी.
(मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------
आयुष्यभर विद्यार्थी बनून शिकत राहा

डॉ. परकार ; महर्षी कर्वे बीसीए कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण

रत्नागिरी, ता. ७ ः कला, क्रीडा आणि साहित्य यावरच सामाजिक स्तर ठरतो. त्यातूनच भरभराट होत असते. देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर आयुष्यभर विद्यार्थी राहून सतत नवीन शिकले पाहिजे. आजच्या समाजाची आणि जगाची दिशा कुठे आहे हे जाणून घेतले पाहिजे. शिक्षणाचे दरवाजे नेहमी उघडतच असतात. महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी प्राप्त केली आहे, याहीपेक्षा अधिक यश मिळवावे, असे आवाहन ज्येष्ठ डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.
शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींचा उत्कर्षम् हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी डॉ. परकार बोलत होते. ते म्हणाले, सॅनफ्रान्सिस्कोमधील गुगलच्या कार्यालयात जाण्याचा योग आला. तेथे बाहेर डायनासोरचा पुतळा आहे. हा पुतळा येथे का असा मला प्रश्न पडला. त्या वेळी सांगण्यात आले, काळानुरूप बदल न केल्याने डायनासोरचे अस्तित्व संपले. तसे होऊ नये याकरिता अद्ययावत राहावे, हा संदेश दिला आहे. व्यासपीठावर प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, प्रकल्प सदस्य प्रसन्न दामले, डॉ. दीपक जोशी आणि उपस्थित होते.

सुरभी बापट सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी
सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार सुरभी बापट हिला प्रदान करण्यात आला तसेच विविध स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद द्वितीय वर्ष बीसीए कॉलेज या संघाला देण्यात आले. विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या व कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार या कार्यक्रमात केला. त्याचबरोबर लायन्स क्लबचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद तेंडुलकर यांचाही सन्मान करण्यात आला.