
क्राईम पट्टा
rat०७७.txt
(पान ३ साठी)
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
पावस ः रत्नागिरी ते पावस या मार्गावरील गोळप उतारावर अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. रामप्रसाद भागीराम चौधरी (वय ५२, रा. गोळप) असे जखमींचे नाव आहे. याची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती, रत्नागिरी येथील प्रशांत अनंत यादव यांनी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात फिर्याद नोंदवली आहे. ५ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. गोळप येथील सुनील लिमये यांच्या आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी कामगार रामप्रसाद भागीराम चौधरी (वय ५२, रा. गोळप) हे त्यांच्याकडेच राहतात. ते रत्नागिरी पावस या मार्गावर गोळप उतारावर चालत असताना त्यांना अज्ञात वाहनाने ठोकर देऊन दिली. याबाबत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
आझाद कॉलनीतून दुचाकीची चोरी
रत्नागिरी ः शहरातील आझाद कॉलनी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकीची चोरी केली. हा प्रकार ५ जानेवारी सकाळी १० वाजण्याच्या कालावधीत घडला. याबाबत अमान नौशाद शेकासन (वय २२, रा. राहत अपार्टमेंट आझाद कॉलनी, रत्नागिरी ) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्याने आपली दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही.त्याला आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच अमानने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
---
फोटो ओळी
-rat७p२१.jpg ः
७३८४५
खेड ः खोपीहून खेडकडे येणारी अपघातग्रस्त एसटी बस आणि अपघातग्रस्त मोटार.
--
एसटी बस मोटारीचा अपघात
खेड ः खेड-खोपी मार्गावर एसटी बसने पाठीमागून मोटारीला धडक दिली. हा अपघात आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास झाला. खोपीहून खेडकडे जाणारी बसने तिसंगीहून खेडकडे जाणाऱ्या मोटारीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही; मात्र या अपघातात मोटारीचे नुकसान झाले असून, या अपघाताची रात्री उशिरापर्यंत खेड पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी अधिक माहिती मिळू शकली नाही.