
किरण सामंतांच्या वाढदिनी अक्कलकोट येथे दुग्धाभिषेक
73870
अक्कलकोट ः येथे समाधीस्थानी दुग्धाभिषेक करण्यात आला.
किरण सामंतांच्या वाढदिनी
अक्कलकोट येथे दुग्धाभिषेक
आचरा ः उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. शनिवारी सकाळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांच्यातर्फे अक्ककोट समाधी मठ येथे चोलाप्पा महाराजांचे पाचवे वंशज नितीन गुरुजी यांच्या हस्ते समाधीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी किरण सामंत २०२४ मध्ये खासदार व्हावेत, असे साकडे स्वामी चरणी कार्यकर्त्यांनी घातले.
..................
पावशी येथे आज ‘कूर्मदासाची वारी’
कुडाळ ः श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ, पावशी-मिटक्याचीवाडी यांच्यातर्फे पावशीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ उद्या (ता. ८) सायंकाळी साडेसहाला तेथील ब्राह्मणदेव मंदिर सभामंडप मिटक्याचीवाडी (तवटेवाडी) येथे आयोजित केला आहे. त्यानंतर सायंकाळी सातला अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा ‘कूर्मदासाची वारी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.