कशेडी घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात
कशेडी घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात

कशेडी घाटात तीन वाहनांचा भीषण अपघात

sakal_logo
By

rat७p२४.jpg
73881
खेडः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात ट्रेलर, ट्रक व स्विफ्ट यांच्या विचित्र अपघातात झालेली वाहनांची दुरवस्था.
---------------
कशेडी घाटात तीन वाहनांचा
अपघात, तीन जखमी
खेड, ता. ७ः मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटातील दरेकरवाडीनजीक दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ट्रेलर, ट्रक व स्विफ्ट यांचा विचित्र अपघात झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (ता. ६) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर हद्दीत आमदार योगेश कदम यांच्या मोटारीला झालेल्या अपघाताला २४ तास होण्यापूर्वीच घाटातील खेड बाजूला कशेडी दरेकरवाडीनजीक तीन वाहनांचा शनिवारी (ता. ७ ) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला आहे. कशेडी घाटात मारूती स्विफ्ट मोटार (एमएच-४७-एजी-५७४८), ट्रक (जीजे-१५-एव्ही- ०४२४) व ट्रेलर (एमएच-४६-बीयू-१७६९) यांचा विचित्र अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितनुसार, ट्रेलरला व स्विफ्ट मोटारीला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात राम सिंग पांडे (वय ५०) यांच्यासह तीनजण (अन्य दोघांची नावे समजू शकली नाहीत) गंभीर जखमी झाले.