एमएस बांधणीच्या 220 एसटी गाड्यांना अधिक पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमएस बांधणीच्या 220 एसटी गाड्यांना अधिक पसंती
एमएस बांधणीच्या 220 एसटी गाड्यांना अधिक पसंती

एमएस बांधणीच्या 220 एसटी गाड्यांना अधिक पसंती

sakal_logo
By

rat०७१९.txt

(पान ५ साठी)

नव्या बांधणीच्या २२० एसटी बसना पसंती

खडखड होणार कमी ; आराम, आसन व्यवस्थेत बदल

रत्नागिरी, ता. ७ ः जुन्या बांधणीच्या एसटी गाड्यांपेक्षा नव्या एमएस (माईल्ड स्टील) बांधणीच्या गाड्यांना प्रवाशांकडून जास्त पसंती मिळत आहे. या गाड्यांची उंचीही अधिक असून बैठक व्यवस्थेमध्ये बदल केला आहे. ती अधिक आरामदायी आहे. त्यामुळे एसटीने जिल्ह्यात सुमारे २२० माईल्ड स्टील बांधणीच्या गाड्या रत्नागिरी एसटी आगाराने बांधल्या आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणूनच एसटीकडे पाहिले जाते. कोरोनाच्या कठीण काळानंतर आता एसटी सावरत आहे; परंतु एकूणच एसटीच्या गाड्यांची परिस्थिती पाहता प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होण्यावर जास्त भर दिला जातो; परंतु गेल्या काही दिवासांपासून एसटीच्या गाड्यांची दुरवस्था पाहून अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत विभाग नियंत्रकांना पत्र दिले होते. एसटीच्या गाड्या स्वच्छ असाव्यात, खडखड करणाऱ्या, वाजणाऱ्या नसाव्यात, आसन व्यवस्था काहीवेळा डळमळीत असते ती सुरक्षित असावी, गाड्यांचे पत्रे उचकटलेले, सुटलेले असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. तेव्हा विभाग नियंत्रकांनी यामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार एसटीने एमएस बांधणीच्या गाड्या बांधण्यास सुरवात केली आहे. याला प्रवाशांनीही पसंती दिली आहे.
एसटी वाडीवस्तीवरून, रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करताना गाड्यांचे घर्षण होऊन पत्र्यांची झीज झाली आहे. त्यामुळे अॅल्युमिनियम बांधणीच्या जुन्या गाड्यांचे पत्रे बस धावताना खडखड वाजतात. तुटलेल्या खिडक्याही वाजतात. त्यामुळे प्रवासी बसमधून प्रवास करताना कंटाळतात. एसटीच्या गाड्यांची नवीन पद्धतीने (एम.एस) बांधणी करण्यात येत आहे. खडखड करणाऱ्या गाड्याना पर्याय म्हणून जुन्या चेसीसवर विशिष्ट प्रकारच्या पोलादाने गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे या गाड्यांची उंचीही वाढवली आहे. शिवाय प्रवासी बैठकीसाठी सीटच्या रचनेतही बदल केला आहे. विठाई, लालपरी या गाड्यांना प्रवाशांतून पसंती होत आहे. नवीन बसेसची बांधणी माईल्ड स्टीलपासून बनवल्या आहेत. त्यामुळे प्रवासात खडखडाट होत नाही. महाराष्ट्रातील रस्त्यांचा विचार करूनच बसेसची बांधणी करण्यात आली आहे.

कोट...

अॅल्युमिनियम बांधणीच्या गाड्यांची झीज होऊन प्रवासात गाड्यांची खडखड वाढल्यानेच एमएस (माईल्ड स्टील) बांधणीच्या गाड्या तयार करून वापरात आणल्या आहेत. एसटीची बांधणी व अंतर्गत रचनाही बदलली आहे.
- अनिल मेहत्तर, विभागीय वाहतूक, रत्नागिरी

--
चौकट-

तालुकानिहाय असलेल्या गाड्या,

मंडणगड - ४८
दापोली - ८८
खेड - ८६
चिपळूण - ११७
गुहागर -७३
देवरूख - ८३
रत्नागिरी -१४९
लांजा - ५०
राजापूर - ६४