खेड ः पोलादपूर-कशेडी घाटात डंपरची पोलिस जीपसह फोर्ड कारला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः पोलादपूर-कशेडी घाटात डंपरची पोलिस जीपसह फोर्ड कारला धडक
खेड ः पोलादपूर-कशेडी घाटात डंपरची पोलिस जीपसह फोर्ड कारला धडक

खेड ः पोलादपूर-कशेडी घाटात डंपरची पोलिस जीपसह फोर्ड कारला धडक

sakal_logo
By

फोटो rat७p२६.jpg
73860
खेड ः आमदार कदम यांची कशेडी घाटातील अपघातग्रस्त मोटार.

फोटो rat७p२७.jpg
73861
मागून ठोकर दिलेला डंपर.

०००

योगेश कदम यांच्या मोटारीला अपघात


कशेडी घाटात डंपरची धडक; दोघे किरकोळ जखमी


खेड, ता. ७ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चोळई (ता. खेड) गावाच्या हद्दीत कशेडी घाट उतारावर एका डंपरने खेडचे आमदार योगेश कदम यांची मोटार आणि त्यांच्या संरक्षणांतर्गत तैनात पोलिस जीपला धडक दिली. या अपघातामध्ये आमदार कदम थोडक्यात बचावले; मात्र, सरकारी पोलिस वाहनातील तीन पोलिस कर्मचारी आणि आमदार कदम यांचा चालक किरकोळ जखमी झाले.
शुक्रवारी (ता. ६) जानेवारी २०२३ ला रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चोळई गावाच्या हद्दीत डायव्हर्शनजवळ एका भरधाव डंपरच्या (एमएच ०४, एलई ७९८१) चालकाने खेडकडून मुंबईच्या दिशेने जाताना मोटारीला (एमएच ४८, सीसी ०५००) जोरदार धडक दिली. या कारची धडक एस्कॉर्ट ताफ्यातील सरकारी जीपला (एमएच १२, टीडी ७८७६) बसली. यामध्ये दीपक कदम (वय ४६, रा. जामगे, ता. खेड), व्ही. व्ही. जाधव आणि पी. एस. मोरे (दोघेही पोलादपूर पोलिस ठाणे) हे दोघे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर डंपरचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस तसेच वाहतूक पोलिस यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहनांतून आमदार योगेश कदम तसेच तीन पोलिस कर्मचारी यांना बाहेर काढले, तसेच त्यांच्या बॅगा व सामान आदीही त्यांच्या ताब्यात देऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलादपूर पोलिस ठाण्यासमोर लावली.
या घटनेची माहिती तातडीने सर्वत्र पसरली आणि खेडचे पोलिस उपअधीक्षक काशीद, माणगावचे जिल्हा गस्त अधिकारी पोलिस निरीक्षक पाटील, पोलादपूरचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज म्हसकर यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस कर्मचाऱ्यांसह भेट दिली. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल झाला. या अपघातानंतर खेडचे आमदार योगेश कदम यांनी त्यांच्यावरील प्राणघातक हल्ला असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिल्याने या डंपरचा चालक पकडण्याचे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर आहे.