गाळ काढण्यासाठी आंदोलनाची गरज काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळ काढण्यासाठी आंदोलनाची गरज काय
गाळ काढण्यासाठी आंदोलनाची गरज काय

गाळ काढण्यासाठी आंदोलनाची गरज काय

sakal_logo
By

rat०७११.txt

बातमी क्र..११ ( पान ५ मेन )

फोटो ओळी
-rat७p२५.jpg-
७३८५९
चिपळूण ः वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
---

गाळ काढण्यासाठी आंदोलन ही दिशाभूल

सतीश कदम ; बापू काणेंनी मोडली समितीची चौकट
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ७ ः गेल्या दोन महिन्यांपासून कमी प्रमाणात का होईना वाशिष्ठीतील गाळ काढण्यास सुरवात झाली; मात्र मोठ्या प्रमाणात गाळ निघण्यासाठी चिपळूण बचाव समितीकडून पाहिजे त्या प्रमाणात यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात नाही. समिती सदस्यांनाही विश्वासात घेतले जात नाही. गाळ काढण्यासाठी आता आंदोलनाची गरज नाही. चिपळूणकरांना गृहित धरून समितीने २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून समितीचे ज्येष्ठ बापू काणे यांनी चौकट मोडली. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय वास येतो असा आरोप समिती सदस्य सतीश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

चिपळुणात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी व शिवनदीतीला गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. लोकांच्या उद्रेकातून चिपळूण बचाव समितीची स्थापना झाली. चिपळूणकरांच्या रेट्यामुळे गाळ काढण्यासाठी मोठी यंत्रणा कामास लागली; मात्र दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. त्यातच मोडक समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर बचाव समितीत फूट पडली. त्याचे पडसाद म्हणून सदस्य सतीश कदम यांनी पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले. ते म्हणाले, यापूर्वी समितीच्या बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर केले जात होते. आता मात्र सदस्यांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेतले जातात. ज्येष्ठ सदस्य बापू काणे यांनी समितीची चौकट मोडली आहे. गाळ काढण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे नियमित पाठपुरावा केला जात नाही. सुरू असलेल्या कामाची नीट माहिती घेत नाहीत. चिपळूणकरांची दिशाभूल करून आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आंदोलन करण्यामागे राजकीय हेतुचा वास येत आहे. काढलेला गाळ टाकण्यासाठी शहरात जागा नाही. त्याचा समितीकडून पाठपुरावा केला जात नाही. केवळ चिपळूणकरांना गृहित धरून आंदोलनाची हाक दिली जाते. मूळ मुद्दा बाजूला ठेवून कोणाच्या फायद्यासाठी हे आंदोलन केले जाते, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.


समितीच्या काही गोष्टी पटत नाहीत

चिपळूण बचाव समितीसोबत सुरवातीपासून आपण कार्यरत होतो; मात्र गेल्या काही बैठकींना आपण अनुपस्थित राहिलो. समितीच्या काही गोष्टी न पटल्यानेच आपण ही भूमिका घेतली. त्यानंतर आता समितीने कोणालाही विश्वासात न घेता थेट आंदोलनाची भूमिका घेतल्याने नाइलाजास्तव भूमिका मांडावी लागली,असे कदम यानी सांगितले.