कशेडी घाटाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाटाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेला अपघात
कशेडी घाटाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेला अपघात

कशेडी घाटाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेला अपघात

sakal_logo
By

rat०७३८.txt

बातमी क्र..३८ ( पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat७p३२.jpg ः
७३८९३
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या पायथ्याशी रुग्णवाहिकेला अपघात झाला.

कशेडी घाटाच्या पायथ्याशी
रुग्णवाहिका उलटून एक जखमी

खेड, ता. ७ ः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या पायथ्याशी शुक्रवारी (ता. ६) सकाळी पावणेआठ वाजता रत्नागिरी येथून ठाण्यात चाललेली रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून एकजण जखमी झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथून रुग्णवाहिका चालक निखिल नवनाथ शिवलकर (२८, रा. रत्नागिरी) हा वॉर्डबॉय अमित मनोज जाधव (४०, रा. रत्नागिरी) याला सोबत घेऊन ठाणे येथे जात होते. ते कोविड कीट घेऊन जात असताना कशेडी घाटाच्या पायथ्याशी हॉटेल अनुसयाच्या समोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उलटली. या अपघातात वॉर्डबॉय अमित जाधवच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, चालक निखिल शिवलकर हा किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती श्री जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका चालक मुकुंद मोरे यांनी कळताच तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले.