
कणकवली ''खरेदी-विक्री''त भाजपचे वर्चस्व
73911
कणकवली : खरेदी-विक्री संघ निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतर शनिवारी जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते.
कणकवली ‘खरेदी-विक्री’त
भाजपचे वर्चस्व; सेनेला धक्का
कणकवली, ता. ७ : कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले. निवडणूक झालेल्या १५ पैकी १४ जागांवर भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार विजयी झाले. गणेश तांबे यापूर्वीच बिनविरोध ठरले होते.
खरेदी-विक्री संघ निवडणुकीसाठी सकाळी मतदान झाले. आमदार नीतेश राणे यांनीही रांगेत उभे राहून मतदान केले. भाजप आणि शिंदे गट विरोधात शिवसेना अशी थेट लढत झाली. विजयी उमेदवारांमध्ये प्राथमिक शेती सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप आणि शिंदे गट युतीचे किरण गावकर (२७ मते), सुरेश ढवळ (२७), अतुल दळवी (२६), श्रीपत पाताडे (२६), रघुनाथ राणे (२६), संजय शिरसाट (२७) आणि प्रशांत सावंत (२६) विजयी झाले. इतर प्रकारच्या संस्था मतदारसंघातून शिंदे गटाचे मिथिल सावंत (१६), व्यक्ती सदस्य प्रतिनिधी गटातून भाजपचे प्रकाश सावंत (३७०), गुरुप्रसाद वायंगणकर (३२९), महिला प्रतिनिधीसाठी भाजपच्या लीना परब (४०४), स्मिता पावसकर (३८३), इतर मागास प्रवर्गातून भाजपचे सदानंद हळदिवे (३७३) आणि विशेष मागास प्रवर्गातून भाजपच्या विनिता बुचडे (३७८) विजयी ठरल्या. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून भाजपचे गणेश तांबे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे सर्व १५ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
-------------