
सामाजिक जडणघडणीत पत्रकारितेला महत्त्व
73995
कुडाळ ः पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना तहसीलदार अमोल पाठक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर. सोबत पत्रकार बंधू.
सामाजिक जडणघडणीत
पत्रकारितेला महत्त्व
तहसीलदार पाठक ः कुडाळमध्ये पत्रकार दिन
कुडाळ, ता. ७ ः स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारितेचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्यानंतर जी लोकशाही टिकली आणि रुजली, त्यात चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. समाजाच्या जडणघडणीत, बदलात पत्रकारितेला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी शुक्रवारी (ता. ६) येथील तहसील कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
येथील तहसील कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर व पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुडाळ तालुका उपाध्यक्ष रवी गावडे, सचिव विलास कुडाळकर, खजिनदार अजय सावंत, प्रमोद म्हाडगुत, नीलेश उर्फ बंड्या जोशी, रजनीकांत कदम, प्रसाद राणे, अजित परब, राजाराम परब, पद्माकर वालावलकर, रोहन नाईक, काशिराम गायकवाड, बाळा राणे, अभय परुळेकर, संजय तेंडोलकर आदी उपस्थित होते. कुडाळ पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक नरेंद्र एडके यांनी पत्रकारितेचा इतिहास व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदानाबाबत माहिती सांगितली.