राजापूर ः बाडग्यांकडून विश्‍वासघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः बाडग्यांकडून विश्‍वासघात
राजापूर ः बाडग्यांकडून विश्‍वासघात

राजापूर ः बाडग्यांकडून विश्‍वासघात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat8p8.jpg- KOP23L74005 राजापूर ः नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करताना खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आदी
-rat8p9.jpg- ःKOP23L74007 प्रकाश कातकर यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन स्वागत करताना खासदार विनायक राऊत आदी.
--------------

शिवसेनेमुळे मोठे झालेल्या बाडग्यांकडून विश्‍वासघात

खासदार विनायक राऊत ; नूतन सरपंच, उपसरपंचांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः शिवसेनेमुळे मोठे झालेल्या बाडग्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वासघात केला. राजापूरमध्ये शिवसेना मजबूत असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय निश्‍चित असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच गावचा कारभार करण्यासंबंधित त्यांनी नूतन सरपंच, उपसरपंचांनाही मार्गदर्शन केले.
या वेळी शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसह इस्रोसह नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील मातोश्री सभागृहामध्ये खासदार राऊत यांनी शिवसेना पक्ष सोडणार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेमुळे मोठे झालेल्या बाडग्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वासघात केल्याची टीका करून त्यानी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून नेमका कारभार कसा करावा या संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले.
आमदार साळवी यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचे अभिनंदन करताना पूर्वीच्या तुलनेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतींच्या घटलेल्या संख्येबाबत सार्‍यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या वेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख महाडीक, जिल्हाप्रमुख चाळके, उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख नकाशे आदींनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी करताना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने मिळवलेल्या यशाचा आढावा आढावा घेतला. सूत्रसंचालन माजी उपसभापती उमेश पराडकर यांनी केले. जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, पांडुरंग उपळकर, चंद्रप्रकाश नकाशे, अनिल भोवड, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संतोष हातणकर, संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
------------------
चौकट
प्रकाश कातकर यांचा शिवसेनेत प्रवेश
राजापूर अर्बन बँकेच्या निवडणूक आखाड्यातील परिवर्तन पॅनेलचे उमेदवार प्रकाश कातकर यांनी मेळाव्यात शिवबंधन बांधून आणि खांद्यावर भगवा झेंडा घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी जोरदार स्वागत केले.